भंडारा तालुक्यातून पवनीकडे जाणाऱ्या महामार्गावरील गिरोला जुना टोल नाका परिसरात आज १८ जानेवारी रोजी सकाळी ७:४० च्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन ६५ वर्षीय महिला जखमी झाली, मात्र रुग्णवाहिकेच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. सिली अंबाडी येथील रहिवासी सुशीला तुकाराम बावनकुळे या आपल्या मुलासोबत दुचाकी (क्र. MH 36 Q 5452) ने अंबाडीवरून भंडाऱ्याकडे जात असताना, गिरोला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्या गाडीवरून खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली.