,शिरजगाव कसबा जिल्हा परिषद सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी चमक ते कुष्टा पर्यंत जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाला केली असल्याची माहिती आज दिनांक 22 डिसेंबरला दुपारी 1 वाजता प्राप्त झाली आहे. खराब रस्त्यामुळे या रस्त्यावरून धावणारी एसटी बस गावापर्यंत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सुखदेवराव पवार यांनी सांगितले. रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील यांनी दिला आहे