कन्नड: तालुक्यात खासदार संदीपान भुमरे यांची पावसाने बाधित भागांची पाहणी
कन्नड तालुक्यातील अंतापूर, टाकळी, अंधानेर, नागद, तिडका, घौसला, पूल, निमखेडी, बोरमाल तांडा, आडगाव पीशोर, नाचनवेल व मोहरा या भागांना खासदार संदीपान भुमरे यांनी भेट देऊन मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या पिकांचे नुकसान पाहून खासदार भावुक झाले.या संकटाच्या काळात शेतकरी बांधव एकटे नाहीत, सरकार ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.