जिल्ह्यातील गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होता काम नये. असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, उपस्थित होते.