एरंडोल: भालगाव गावात बोरगाव जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याजवळ उभ्या असलेल्या दोघं भावांना दुचाकीची धडक,एक जखमी,एरंडोल पोलिसात गुन्हा
एरंडोल तालुक्यात भालगाव हे गाव आहे. या गावातून बोरगाव जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याजवळ चिंचेच्या झाडाखाली संजय पाटील व त्यांचा भाऊ उभे होते. तेथे भरधाव वेगात दुचाकी क्रमांक एम. एच. १९ ए. जे.७९४७ घेऊन योगेश पाटील हे आले व त्यांनी त्यांना धडक दिली यात संजय पाटील यांचा भाऊ जखमी झाला तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.