विक्रमगड: नालासोपारा येथे इमारतीतील सदनिकेत स्लॅबचे प्लास्टर कोसळले
नालासोपारा येथे एका इमारतीच्या सदनिकेचे स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. फन फिस्ट यशवंत गौरव फेज टू परिसरातील ऑरेंज हाइट्स या ९ मजली इमारतीत पहिल्या मजल्यावरील सदनिकेतील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले. या घटनेत बारा वर्षाचा एक मुलगा सुदैवाने बचावला आहे. या घटनेमुळे मराठीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे.