हिंगणघाट: तावी येथे अतिवृष्टी व विविध रोगाने ग्रासलेल्या अडीच एकरातील सोयबीन पिकाला शेतकऱ्याने लावली आग
यंदा अतिवृष्टी व सोयाबीन पिकावर आलेल्या विविध रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक निर्सगाने हिरावून नेले आहे.तावी येथील शेतकऱ्याने सोयाबीनचे पिक येणारच नाही या भितीने अडीच एकरातील सोयबीन पिकाला चक्क स्वताच्या डोळ्यासमोर आपल्या हाताने आगीच्या स्वाधीन केले.तावी येथील प्रकाश बलकी या ५ एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याने अडीच एकर शेतजमीनवर कापूस तर अडीच एकरमध्ये सोयबीनची पेरणी केली सोयबीनला चांगले रासायनिक खते दिले, मशागत केली.