प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथे कार्तिक एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. सर्वप्रथम सकाळी गावामधून श्रीची प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळे. व बाहेर फक्त सहभागी झाले होते. त्याचबरोबर श्री पांडुरंग संस्थान व गावकरी यांच्यावतीने कार्तिक यात्रा महोत्सव सुद्धा सुरू असून या महोत्सवाची सांगता दिनांक पाच नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने होणार आहे.