जालना-मंठा महामार्गावरील पीरकल्याण फाट्या परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिरकल्याण प्रकल्प येथील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती हा घराकडे दुचाकीवरून जात असताना भरधाव फॉर्च्युनर वाहनाने दिलेल्या जबर धडकेत हा दुर्घटनाग्रस्त मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गायकवाड हे दुचाकीवरून पीरकल्याण फाटा ओलांडत गावाच्या दिशेने जात होते.