महाड मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे मारहाण प्रकरणी महाड बंदची हाक.. ० मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतुन मनसेना महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक, राज्य प्रवक्ता योगेश चिले यांना महाड शहर पोलिसांना धरले धारेवर ० आरोपींना अटक करा अन्यथा महाड बंद मनसे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे याला झालेल्या मारहाण प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी बंदची हाक दिली आहे. मारहाण होऊन आठ दिवस होत आहेत मात्र आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.