गोधणी रेल्वे येथील म्हाडा कॉलनी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या बिबट्याने भरदिवसा एका पाळीव प्राण्याची शिकार केल्याची माहिती समोर आली असून, यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. वनविभागाच्या पथकाने परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.