दि. 27 ऑक्टोबर च्या रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मौजा चारगाव येथील शेतात असलेल्या विहिरीत यातील मृतक नामे चंद्रप्रकाश पटले वय 45 वर्ष हा अर्जुनी येथे मंडळी पाहण्याकरिता गेला असता दिनांक 27 ऑक्टोबर च्या रात्री 9:30 वाजेच्या सुमारास प्रदीप बावनकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. फिर्यादी ओमप्रकाश पटले यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन रावनवाडी येथे दिनांक 28 ऑक्टोबरला 4:15 वाजेच्या सुमारास रावनवाडी पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे.