नियमित रक्तदाब तपासणी बाबत माहिती.
4.3k views | Jalna, Maharashtra | Oct 10, 2025 जालना: दि.१०/१०/२५ आपले हृदय २४*७ मध्ये कधीच विश्रांती घेत नाही. २४ तास सतत कार्यरत असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, दृष्टी कमी होणे, कमकुवत रक्तवाहिन्या, मूत्रपिंड निकामी होणे यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नियमित रक्तदाब तपासणी करण्यात यावी. शासकीय रुग्णालयामध्ये रक्तदाब तपासणी मोफत आहे. निरोगी हृदय, आनंदी जीवन. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.