सुदवडी गावात ( ता. मावळ ) अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता ओढ्याच्या काठावर करण्यात आली.या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अंदाजे ६० वर्षीय महिलेवर गुन्हा नोंदविला आहे. ती येलवाडी, हवेली येथे राहत असून ती फरार आहे.