राहुरी: देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी वरखडे तर शेटे व्हा.चेअरमन
देवळाली प्रवरा सोसायटीच्या चेअरमनपदी मंजाबापू वरखडे तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब जगन्नाथ शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज बुधवारी सकाळी दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवळाली सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड प्रकिया सकाळी सोसायटीच्या सभागृहात ही निवड प्रकिया पार पडली. रोटेशन नुसार दर वर्षी चेअरमन व व्हा.चेअरमन निवड दरवर्षी दिवाळी पाडव्याला केली जाते.