कळमेश्वर एमआयडीसी परिसरातील एशियन केमिकल कंपनीत अनुदानित रासायनिक खताचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार गुरुवार बारा मार्च उघडकीस आला कृषी विभागाने टाकलेल्या धागेत 281 बॅग युरियाचा साठा आढळून आला शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कराळे यांच्या माहितीनुसार कळमेश्वर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक पाच येथील एशियन केमिकल कंपनीत पाहणी करण्यात आली यावेळी हा साठा आढळून आला