धुळे: आयुक्तांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर फेरीवाल्यांचे आमरण उपोषण स्थगित; १८ सप्टेंबरला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे शहरातील आग्रारोडवरील फेरीवाला व्यावसायिकांचे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आज महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासोबत महानगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि फेरीवाला प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.