अंबड: मत्स्योदरी महाविद्यालयात दोन दिवसीय जालना जिल्हा युवा महोत्सव 2025 चे आयोजन प्राचार्य मिलिंद पंडीत यांची माहिती
Ambad, Jalna | Sep 14, 2025 जालन्याच्या अंबड शहरातील मच्छोदरी शिक्षण संस्था संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंबड व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने जालना जिल्हा युवा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. यात 102 महाविद्यालयाचे 700 विद्यार्थी भाग घेणार असल्याची माहिती प्राचार्य मिलिंद पंडीत यांनी दिली असून अंबड व जालना जिल्हा साठी ही पर्वणीच असणार असल्याचे त्यांनी सांगितले.ते आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांशी बोलत होते.