जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र सावरगांव कान्होबा या गावातील अमोल रमेश महल्ले वय ४२ वर्षे या युवा शेतकऱ्याने वडिलोपार्जित थकलेल्या कर्जाच्या विवंचनेत स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल महल्ले यांच्याकडे वडिलोपार्जित गट क्रमांक २३ मध्ये १ हेक्टर ७२ आर शेतजमीन सावरगांव शेत शिवारात आहे.सन २०१८-०१९ यावर्षी सेवा सहकारी सोसायटी मधून एक लाख पन्नास हजार रुपयाचे कर्ज स्वतःच्या घरात गळ्याला फास लावून जीवन संपविले.