सावने तालुक्यातील मालेगाव येथे सध्या उडान पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे या कामादरम्यान मजुरांना आणि स्थानिक नागरिकांना अचानक एक सात ते आठ फूट ला महाकाय अजगर दिसून आला एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. लगेच सर्पमित्र हितेश बनसोड यांना ही बातमी देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी व त्यांच्या टीमने या अजगराला पकडून जीवनदान दिले