शिरूर: शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
Shirur, Pune | Sep 30, 2025 शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करत तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. दरोडे, मारामाऱ्या, अवैध शस्त्र बाळगणे, जातीवाचक शिवीगाळ व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.