जलालखेडा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहणा येथील एका ४६ वर्षीय नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.दिलीप नथ्थू शेंडे वय ४६ वर्ष असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन आणि मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. ही घटना २०१७ मध्ये उघडकीस आली होती.या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केला.