दक्षिण सोलापूर: पुरस्थिती ओसरताच मनगोळी ग्रामस्थ एकत्र: सरपंचांच्या पुढाकाराने गावात राबवले स्वच्छता अभियान...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावात अलीकडील पुरस्थिती ओसरल्यानंतर गावाच्या पुनर्वसन आणि आरोग्याच्या दृष्टीने रविवारी सकाळी 8 वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा ग्रामपंचायत सरपंच तेजश्री गायकवाड आणि सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, तरुण, महिला मंडळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पूरामुळे गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि घरांच्या परिसरात चिखल व कचरा साचला होता.