धुळे: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा पुढाकार; स्वखर्चाने डोंगरगाव धरणाचा कालवा केला दुरुस्त
Dhule, Dhule | Sep 14, 2025 प्रशासनाच्या उदासीनतेमुळे डोंगरगाव धरणाची जीवनवाहिनी असलेल्या पाझरा नदीच्या कालव्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. सोनवद, वालखेडासह गावकऱ्यांनी स्वखर्चाने व श्रमदानातून तब्बल १४ किमी कालवा दुरुस्त केला. रेल्वेमुळे झालेले अडथळेही दूर करण्यात आले. त्यामुळे महिनाभर ठप्प असलेला पाणीप्रवाह ३०-४०% वाढला असून तरुणांनी धरण भरेपर्यंत २४ तास निगराणी ठेवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे अनेक गावांची पाणीटंचाई दूर होण्याची आशा निर्माण झाली.