जुन्नर: कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशाची जुन्नर पोलिसांकडून सुटका
Junnar, Pune | Nov 22, 2025 जुन्नर येथे कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या गोवंशाची खलीलपुरा येथून पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या तीन गायी, एक कालवड यांना संगमनेर येथील जीवदया पांजरपोळ गोशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.