चाळीसगाव: चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला 'आदर्श बाजार समिती' पुरस्कार
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नुकताच 'मा. वसंतराव दादा पाटील स्मृती आदर्श बाजार समिती विशेष पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. नाशिक विभागातून आदर्श बाजार समिती म्हणून चाळीसगाव बाजार समितीचा गौरव करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील एक मोठी आणि प्रसिद्ध बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाळीसगाव बाजार समितीने शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.