यवतमाळ: सेवा पंधरवड्याचा जिल्ह्यात शुभारंभ ;‘मिशन मोड’वर कामे करून नागरिकांना सेवेचा लाभ द्यावा; जिल्हाधिकारी
आपले विहित कर्तव्य योग्यरीत्या बजावणे हीच खरी देशसेवा असते. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमात ‘मिशन मोड’वर कामे करून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा, तसेच महसुली सेवेचा लाभ मिळवून द्यावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.