दिग्रस तालुक्यातील लाख शेत शिवारात विहिरीत बसवलेली पाण्याची मोटार, केबल व नोजल असा एकूण सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकरी प्रमोद नारायण चौधरी यांनी दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.