यवतमाळ: मुख्यमंत्री दौऱ्याचा गुरुदेव युवा संघाकडून काळी फिती दाखवत जाहीर निषेध
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टीचे प्रचंड नुकसान आणि कर्जबाजारीपणाने हैराण असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचा गुरुदेव युवा संघाकडून आज जाहीर निषेध करण्यात आला. "मुख्यमंत्री हे फक्त राजकीय सोहळ्यांना आणि पक्षीय कार्यक्रमांना वेळ देतात, पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून पळ काढतात," असा आरोप संघाने केला.