कळमेश्वर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकर चौक येथे आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे बिजलाल रघुवंशी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते