हिंगणा: गुमगावातील ३५ अतिक्रमणधारकांना पट्टे मंजूर
Hingna, Nagpur | Sep 23, 2025 छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात गुमगाव येथील ३५ अतिक्रमणधारकांना पट्टे मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या २०१०-११च्या नोंदीनुसार झालेल्या निर्णयामुळे उपेक्षित आणि गरजू नागरिकांच्या आशांना मूर्तस्वरूप मिळाले. माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज आष्टनकर व सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन कुमावत व खंडविकास यांच्या उपस्थितीत पट्ट्यांचे वाटप करण्यात येणार.