भंडारा: पालांदूर येथे अवैधरित्या रेती चोरी करणारा ट्रॅक्टर पकडला
चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पालांदूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेती चोरी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पालांदूर येथे घडली. या घटनेत पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक-मालक उमेश वासुदेव सिंग (३५) रा मऱ्हेगाव यांच्या विरोधात पालांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.