जाफराबाद: जळगाव सपकाळ येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट
आज दिनांक एक नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील जळगाव सपकाळ येथे मयत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी किसन बळवंत पाटील सपकाळ यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या सपकाळ पाटील परिवाराची भेट घेत सांत्वन केले आहे तसेच इतर मोहित शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा भेट दिली आहे, यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.