समुद्रपूर: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणेच्या वतीने गिरड येथे शेतकऱ्यासाठी घेण्यात आले बहूपर्णी अर्क निर्मिती प्रशिक्षण शिबिर
गिरड येथील मगन संग्रहालयाच्या सभागृहात शेतकऱ्यासाठी शेतपिकावरील कीड, रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागडे औषध फवारणी करून देखील परिणामता मिळत नाही. यासाठी घरच्या घरी बहुपर्णी अर्क निर्मिती करून पिकांचे संरक्षण करता यावे आणि उत्पादन खर्च कमी व्हावा या उद्देशाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शेतकरी समूहाने एकत्र येत आम्ही बहूपर्णी अर्क निर्मिती केली. तुम्ही कधी करणार असे आव्हानात्मक संदेश शेतकऱ्यांना दिला.