ठाणे: मिरा रोड येथील मानसी बारवर मिरा भाईंदर महापालिकेची तोडक कारवाई
Thane, Thane | Nov 28, 2025 नियम आणि कायद्याचे उल्लंघन करत अनधिकृत बांधकाम केलेल्या मिरा रोड येथील मानसी बारवर मिरा भाईंदर महानगरपालिकेने अखेर आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास तोडक कारवाई केली आहे. काशिमिरा परिसरातील या बारने अनधिकृत बांधकाम केले होते. मिरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझरच्या साहाय्याने मानसी बारचे बांधकाम जमीनदोस्त केले. पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.