गोंदिया: हिवरा येथे बहीण-भावावर हल्ला; दोन आरोपींवर गुन्हा
रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम हिवरा येथील गोंदिया मार्गावर रविवारी (दि. २) बहीण-भावावर दोन व्यक्तींनी हल्ला करून शिवीगाळ व मारहाण केली.हिवरा येथील २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या घरच्यांसोबत सायकलने बाहेरगावी जात असताना आरोपी सनम हरीष धमगाये (२०) व कुणाल वसंत वालदे (२७, दोघे रा. हिवरा) यांनी रस्ता आडवून भांडण सुरू केले. आरोपींनी बहिण-भावाला थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. तिने भावाला वाचविण्याचा प्रयत्न के