घनसावंगी तालुक्यातील सागर कारखाना परिसरातील ऊसतोड मजूर कामगारांच्या छावणीमध्ये गुरुवार, दि. 18 डिसेंबर 2025 रोजी साखर शाळा सुरु करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. कड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमात कायदेविषयक माहिती, बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध, चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन आदी माहिती दिली.