सरकारने ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही याची खात्री केली आहे – भाजप आमदार प्रवीण दरेकर
आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.५२ च्या सुमारास भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आरक्षण देण्यासाठी संविधानाने काही नियम घालून दिले आहेत असे मला वाटते आणि ते कायद्यानुसारच केले जाते. मराठा समाजाला आरक्षण देताना, सरकारने ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही याची खात्री केली आहे.