समुद्रपूर: ६ वर्षांनंतर सायगव्हान येथे पोहचली लालपरी; मोठ्या उत्साहात नागरिकांकडून स्वागत
समुद: सायगव्हान येथे ६ वर्षांपासून बस बंद झाल्याने ,सायगव्हान, सावंगी, लोखंडी येथिल शाळकरी विद्यार्थी व नागरीकांना वडगाव पाटिपर्यंत पायपीट करावी लागत होती. गावकऱ्यांनी यासंबंधी वेळोवेळी हिंगणघाट आगारासी संपर्क साधून निवेदन देऊन सायगव्हान बस सुरू करण्याची मागणी केली होती याची दखल घेऊन आगाराच्या वतीने बस पाठविण्यात आली गावात लालपरीचे आगमन होताच नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी शाळकरी विद्यार्थी व गावकऱ्यांनी बसची विधीवत पूजा करून स्वागत केले.