मुर्तीजापूर: जीतापुर खेडकर रोडवर देशी दारूची दुचाकीवरून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला माना पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक
माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांना बातमी दाराकडून माहिती मिळाली की एक इसम दुचाकी क्रमांक एमएच ३०/बीवाय ४६२८ ने देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करत आहे अशी माहिती प्राप्त झाली असता ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन,पोलीस कॉन्स्टेबल उमेश हरमकर,प्रमोद हिवराळे यांनी ग्राम जीतापुर खेडकर रोडवर सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान नाकाबंदी केली असता आरोपी उमेश सुरेश गोंडाणे याला १ लाख ६ हजाराच्या मुद्देमालासह अटक केली असून अधिक तपास माना पोलीस करीत आहेत