हिंगणा: वाननाडोंगरी मध्ये निवडणुकीत उ.बा.ठा गटाचे उमेदवार महानंदा पाटील यांचा प्रचाराचा वेग वाढला
Hingna, Nagpur | Nov 30, 2025 वानाडोंगरीत प्रचाराचा वेग वाढला; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महानंदा केशव पाटील यांना मोठा लोकसमर्थन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवाराचा वार्डांमध्ये दमदार जनसंपर्क दौरा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार महानंदा केशव पाटील यांनी आज वानाडोंगरीतील विविध वार्डांमध्ये जोरदार जनसंपर्क मोहीम राबवली. घराघरांत भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत पाटील यांनी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रचाराची रंगत अधिकच वाढलेली दिसली. स्थानिकांनी पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता याबाबत मागण्या मांडल्या असून उमेदवारांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.