बुलढाणा: शहरातील ओंकार लॉन्स येथे अभियंता दिवस साजरा व घरचा इंजिनिअर पुस्तकाचे प्रकाशन
बुलढाणा शहरातील ओंकार लॉन्स येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता अभियंता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी इंजिनीयर रंजीत रविंद्र पडोळ यांच्या लेखणीतून साकार झालेले प्रश्न अनेक उत्तर एक "घरचा इंजिनियर" या पुस्तकाचे प्रकाशन आमदार धिरज लिंगाडे यांच्या हस्ते पार पाडले. यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे,नरेश शेळके, सुनील शेळके, बि.टी.जाधव, किसनराव वाघ राजेश देशलहरा व इतर मान्यवर उपस्थित होते.