माजलगाव: शहरातील शिवाजी नगर येथील गुंडावर एमपीडीएची कारवाई
माजलगाव शहरातील शिवाजी नगर भागातील नारायण रावसाहेब करपे, वय ४५, याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आज रविवार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्याला छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात दाखल करण्यात आले.करपे याच्याविरुद्ध जबरी चोरी, महिलांची छेड काढणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा प्रकारचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने बीड जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे.