कालीमाती येथे आयोजित केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.गोंदिया जिल्हापरिषदेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खेळ,कला व सांस्कृतिक कौशल्यांना योग्य दिशा व व्यासपीठ देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.या महोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून गावातील प्रतिभा राज्य व राष्ट्रीय मंचावर झळकण्याची संधी निश्चित मिळेल.यावेळी कार्यक्रमाला प्रिती कतलाम सदस्य जिल्हा परिषद गोंदिया,उपसभापती रामेश्वर महारवाडे,सभापती डॉ.लक्ष्मन भगत उपस्थित होते