पंचशील नगर येथे सुगंधित पानमसाला व तंबाखूची खेप घेऊन येणाऱ्या वाहनावर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कार्यवाही करीत सुगंधित पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुगंधित पानमसाला व तंबाखूची अवैध वाहतूक करणारे इको वाहन व ५५ हजार १८२ रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला आहे. तसेच इको वाहन चालक व मालक आणि संबंधित तस्करांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई ८ डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.