दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुका दिनांक २ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. मात्र अपील असल्याने प्रभाग क्र.२-ब, ५-ब आणि १०-ब या तीन प्रभागांची निवडणूक पुढे ढकलून २० डिसेंबर रोजी घेण्यात आली. आज या तीनही प्रभागांमध्ये एकूण १० मतदान केंद्रांवर शांततेत आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चाललेल्या मतदानात तिन्ही प्रभागांमध्ये मिळून ७२.७० टक्के मतदान नोंदवले गेले. या तीन प्रभागांतील एकूण ८,३७४ मतदारांपैकी ६,०८८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.