चिखली: गोदरी येथील तलावाची तात्काळ दुरुस्ती व उपायोजना करण्याच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिल्या सूचना
चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे गोदरी येथील जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अंतर्गत असलेला तलाव सततच्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरून ओव्हरफुल झाला आहे. त्यामुळे तलाव फुटून गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी तात्काळ संवेदनशीलतेने परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी कार्यकारी अभियंता पिंपळे साहेब यांच्याशी थेट चर्चा करून उपायोजनाकरण्याच्या सूचना दिल्या