शिरूर: रांजणगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरी
Shirur, Pune | Nov 27, 2025 रांजणगाव गणपती येथील स्मशानभुमीसमोर रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्याच्या कडेला घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप फोडून तब्बल ५ लाख २९ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.