कन्नड: पाच दिवसांनी अखेर उलगडा; रामनी नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शिवराईत आढळला
दि 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गराडा येथील ब्राह्मणी गराडा रामनी नदीच्या पुरात वाहून गेलेले मदन झब्बूलाल राठोड (वय 55) यांचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर शिवराई गावातील गट क्रमांक 124 मध्ये आढळून आला.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राम सोनवणे हे दुपारच्या सुमारास शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना नदीकाठावर अज्ञात मृतदेह दिसून आला. त्यांनी याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. तत्काळ गावाचे सरपंच संतोष मट्टे यांनी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधला