रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने गोंदिया शहरातील शक्ती चौक येथे एका ट्रॅव्हल्स बसला धोकादायकरीत्या उभे केल्याच्या प्रकरणी बसचालकाविरुद्ध २२ नोव्हेंबर रोजी कारवाई करून गुन्हा नोंदविला आहे. पोलिस शिपाई सत्यमकुमार दुबे, राजू वनवे आणि धनराज डाहारे हे पथकासह रामनगर परिसरात गस्तीवर होते. त्या दरम्यान एमपी-५० झेड ई ८८२२ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस सार्वजनिक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी असल्याचे पथकास आढळले. बस रस्त्याच्य